कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री या संस्थेच्या श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनिअर कॉलेज कालकुंद्री (ता. चंदगड) येथे रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व इमारत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे.
एन के पाटील (माजी मुख्याध्यापक हनुमान विद्यालय मांडेदुर्ग) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार आयुक्त आर जी पाटील, सौ भारती पाटील, कोकण विभागाचे माजी आयुक्त विलास बाळाराम पाटील, रामराव हरिभाऊ पाटील (ताम्रपणे इंडस्ट्रीयल उद्योग अंबरनाथ), जी व्ही दैठणकर आदींची उपस्थिती राहणार आहे. तर विविध गुणदर्शन कार्यक्रम सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच संभाजी पाटील, कोवाड आउट पोस्ट चे पोलीस निरीक्षक आकाश भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोकितकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक एस एल बेळगावकर, जिमखाना प्रमुख डी एम तेऊरवाडकर, एन जे बाचुळकर व सांस्कृतिक विभाग प्रमुख ई एल पाटील, व्ही पी कांबळे आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment