चंदगड: प्रतिनिधी
वाढदिवस म्हटला की केक,चॉकलेट, भेट वस्तु या सगळ्या खर्चिक गोष्टी आल्या. पण दि न्यू इंग्लिश स्कूल च्या कु. चिराग दुगाणी या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शाळेला ५० रोपे देऊन आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांच्यांत पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून वाढ दिवसा निमित रोपे देण्याचा उपक्रम शाळेत राबवला जात आहे.तर कु. अर्णव जयसिंग पाटील याने वाढ दिवसानिमित्त शाळेला दोन पुस्तके भेट दिली. वाचन चळवळ वाढावी म्हणून हा उपक्रम राब वला जात आहे.
यापूर्वी शाळेत वाढ दिवसानिमित्त 'चॉकलेट नको पुस्तक हवे ' या उपक्रमात दोनशे पुस्तके जमा झाली. यावेळी मुख्याध्यापक एन.डी. देवळे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर, एम.व्ही. कानूरकर,टी. टी. बेरडे, ग्रंथपाल शरद हदगल डी. जी. पाटील, व्ही. टी. पाटील, टी.व्ही. खंदाळे,व्ही. के. गावडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजय साबळे तर आभार बी. आर. चिगरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment