दोडामार्ग / सी. एल. वृत्तसेवा
सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा यांना तसेच शिवकालीन पारगड किल्ला याना जोडणारा व गेली चार वर्षे रखडलेल्या पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता कामासाठी वन विभाग कडून वाढीव मुदत मिळावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी चंदगड यांनी आवश्यक रक्कम वन विभाग कडे जमा केली आहे. तेव्हा वन विभाग यांनी तातडीने यात लक्ष घालून रस्ता कामाला सुरुवात झाली पाहिजे. यासाठी आवश्यक मुदतवाढ तातडीने द्यावी अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल असा इशारा पारगड दशक्रोशी संघर्ष समिती यांनी दिला आहे. शिवाय बांधकाम विभाग यांनी ठेकेदार चांगला नेमावा दोन वर्षे काम रेंगाळले. अशा ठेकेदाराला काम देवू नये अठरा महिने मुदतवाढ असून देखील ठेकेदार यांनी कामे केली नाही. यामुळे काम रखडले असा आरोप केला जात आहे.
पारगड किल्ला ते मोर्ले रस्त्यासाठी दोडामार्ग तसेच चंदगड हद्द मधिल काही वन विभाग यांच्या मालकीची जमीन गेली. हजारो झाडे कापून चंदगड दोडामार्ग येथून चार वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली. पण देवगड येथील ठेकेदार याने ज्याना काम करायला सांगितले यांनी वेळेत काम केले नाही. यामुळे वन विभाग यांनी रस्ता कामासाठी दिलेली मुदत संपली यामुळे चार वर्षे काम बंद पडले आहे. याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. असा आरोप केला जात आहे.
पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद आहे. हा रस्ता झाला पाहिजे. यासाठी अनेक आंदोलन उपोषण केली. या नंतर या रस्त्याला चालना मिळाली. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी कामाला सुरुवात झाली. पारगड किल्ला ते मिरवेल चंदगड हद्द काम झाले. मोर्ले ते मिरवेल हद्द बरेच काम रखडले. वन विभाग यांनी जी मुदतवाढ दिली. त्या वेळेत काम झाले नाही यामुळे वन विभाग यांनी पुढील कामाला रोख लावला.
गेल्या दोन वर्षापासून मोर्ले पारगड दशक्रोशी संघर्ष समिती तातडीने काम सुरू करा अशी मागणी करत आहेत. पण अद्याप बांधकाम विभाग वन विभाग कडून युध्द पातळीवर हालचाल होताना दिसत नाही. बांधकाम विभाग अधिकारी वर्ग मुदतवाढ बाबत आवश्यक रक्कम वन विभाग कडे जमा केली आहे असे सांगतात तर वन विभाग अधिकारी वाढीव मुदतवाढ प्रस्ताव कोल्हापूर नागपूर येथे पाठवला आहे. लवकरच मुदतवाढ मिळेल असे सांगितले जात आहे.
सध्या तिलारी घाटातून एस टी वाहतूक बंद आहे. जर मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता झाला असता तर आज या बसेस या मार्गे सुरू झाल्या असत्या पण चार वर्षे काम बंद आहे. कच्चा रस्ता होता तो खराब झाला आहे. दरम्यान पारगड किल्ला येथील रघुवीर शेलार यांनी मंगळवारी दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी तसेच दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी यांची भेट घेतली. आणि तातडीने मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली.
पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणत्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे. आता उपोषण नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल तेव्हा बांधकाम विभाग वन विभाग यांनी तातडीने रस्ता संदर्भात अडचणी दूर करून कामाला सुरुवात करावी अशी मागणी रघुवीर शेलार, प्रदीप नाईक, सुजाता मणेरीकर, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश नाईक, व इतरांनी केली आहे.
No comments:
Post a Comment