'सारथी' मार्फत मराठा विद्यार्थी व युवा उद्योजकांसाठी उद्या चंदगडात कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2024

'सारथी' मार्फत मराठा विद्यार्थी व युवा उद्योजकांसाठी उद्या चंदगडात कार्यशाळा



चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, 'सारथी' या संस्थेमार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक योजना, नव उद्योजक यांच्या साठी राबवण्यात येणारे प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन, उच्च शिक्षण स्कॉलरशिप या विषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे महासंचालक अशोक काकडे (भा प्र से) हे चंदगड तालुक्यात येणार आहेत. पंचायत समिती हॉल चंदगड येथे उद्या दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. परशराम पाटील (डायरेक्ट, काजु बोर्ड महाराष्ट्र शासन) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात त्यांच्यासह अशोक काकडे उपस्थित विद्यार्थी व नव उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी चंदगड तालुक्यातील मराठा समाजातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर परशराम पाटील यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क - अनिकेत सावंत - 705811117
राजाराम सुकये - 8308404960 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment