चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात एड्स दिन सप्ताह व रक्तदान शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2024

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात एड्स दिन सप्ताह व रक्तदान शिबीर संपन्न

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिन सप्ताह साजरा करण्यात आला.

    या दिनाचे औचित्य साधून शिक्षण महर्षी र. भा. माडखोलकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये 38 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रहिताच्या व जनसेवेच्या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन  शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, डॉ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. डी.गोरल होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वय, डॉ.    संजय.    एन. पाटील यांनी केले. बेळगाव ब्लड बँकेचे समन्वयकडॉ. विनायक मेणसे व त्यांच्या संपूर्ण स्टाफचे सहकार्य लाभले. सौ. प्रमिला पाटील व सौ. अलका निकम या रक्तदात्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सुत्रसंचालन  डॉ. एन. के. पाटील यांनी केले. तर आभार  डॉ. शाहू गावडे यांनी मानले. यावेळी प्रा. आर. पी. पाटील. एन. डी. देवळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. पी. आर. पाटील, एल. डी. कांबळे, नितीन पाटील, ड. संतोष मळवीकर, प्रा. आर. एस. पाटील. प्रा. एस. व्ही. गुरबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment