चंदगड तालुक्यातील पार्ले परिसरात हत्तीबरोबर दोन पिलांचे आगमन, पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2024

चंदगड तालुक्यातील पार्ले परिसरात हत्तीबरोबर दोन पिलांचे आगमन, पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      पार्ले कळसगादे वाघोत्रे येथील जंगलात मुबलक चारा आणि पाण्याची उपलब्धता असल्याने पाटणे वन विभागाने नामकरण केलेल्या आण्णा हत्तीने आपल्या दोन पिल्लासह आपला मुक्काम कायम केला आहे. रात्री जंगलात व दिवसा शेतातील पिकावर ताव मारण्यास सुरु केल्याने ऐन सुगीमध्ये हाता तोंडाशी आलेला घास हती गिळकृत करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. हत्तींच्याकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

        हेरे वनविभागाने नामकरण केल्यानुसार अण्णा नर हत्ती व दोन पिलांचा दोडामार्ग तालुक्यातून पार्ले येथे आगमन झाले. दरवर्षी या परिसरात हत्तींचे आगमन असते. या वेळेलाही नर हती आपल्या दोन पिल्लासह पार्ले परिसरात आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आगमन झालेल्या हत्तींमुळे शेतकरी शेताकडे जायला घाबरत आहेत. शेताकडे घातलेल्या मळण्या, काढलेली नाचणीची कणसं यांचा निभाव लावावा तरी कसा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे. ज्या ठिकाणी धरण परिक्षेत्र आहे. 

    अशा ठिकाणी हत्ती वास्तव्य करतात. रोज शंभर किलो चारा व २०० लिटर पाणी हत्तींना लागते. राहायला मोठे जंगल लागते. अशा पद्धतीचे पूरक वातावरण तिलारी परिसर व वाघोत्री परिसरात असल्याने त्यांचा बराचसा मुक्काम या परिसरात असतो. या परिसरातील ऊस कारखान्यांनी लवकरात लवकर उचल करण्याची गरज आहे. अन्यथा हातातोंडाशी आलेला घास हत्तींना मिळणार आहे. हत्ती ऊस पीक खाण्याबरोबर तुडवून मोठे नुकसाहन करीत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत होत आहे.

No comments:

Post a Comment