चंदगड / प्रतिनिधी
डी. के. शिंदे बी. एड. कॉलेज गडहिंग्लज व माजी विद्यार्थी संघटना बीएड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने २०२४ चा दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार जनता विद्यालय तुर्केवाडी येथील सहाय्यक शिक्षक बाबू नरसू पाटील देण्यात आला.
बी. एन. पाटील यांचे दोन काव्यसंग्रह व दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मराठी अध्यापक संघाच्या वतीने ते अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या हा पुरस्कार माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व थोर शिक्षण तज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी श्रीपतराव शिंदे व ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी बाबुराव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये या यशा पाठीमागे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने काय दिले. सहकारी शिक्षकांचे सहकार्य कसे लाभले आणि त्यातून आपल्याला नवनवीन उपक्रम राबवण्याची संधी मिळाली, यावर आपले विचार व्यक्त केले. डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्जनशील शिक्षकच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितो. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात' असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बी. एम. हिर्डीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी संस्थेच्या इतिहासाचा आढावा घेतला. दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार देण्या पाठीमागचा मुख्य हेतू त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला डॉ. शिवाजी रायकर, सचिव जी. एन. पाटील, सहा ए. के. नाईक, पी. एम . ओऊळकर, एम. एम. मुल्ला, विष्णू पाटील शंकर पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment