तेऊरवाडीच्या दोघांची सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकपदी बढती - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2024

तेऊरवाडीच्या दोघांची सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकपदी बढती

पोलीस उपआयुक्त निंबा पाटील व पोलीस उपनिरीक्षक श्री तेली याच्या हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती स्वीकारताना विश्वनाथ पाटील.

तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विश्वनाथ कृष्णा पाटील व धाकलू निंगापा पाटील यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली. दोघानाही एकाच वेळी बढती मिळाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.

विश्वनाथ पाटील यांनी नाशिक येथे  पोलीस प्रशिक्षण घेतल्या नंतर मुंबई येथे मुख्यालयात सेवा बजावली. यानंतर मुंबई वाहतूक विभागात वायलेसवर गेली अनेक वर्षे सेवा बजावली. या दरम्यान बाळासाहेब ठाकरे, अजित पवार, दिपक केसरकर, शंभूराजे देसाई  आदि महत्वाच्या राजकीय व्यक्तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. या उत्कृष्ठ सेवेबद्दल मुंबईचे पोलीस उपायुक्त निंबा पाटील व पोलीस उपनिरीक्षक श्री. तेली यांच्या हस्ते विश्वनाथ पाटील यांना मुलंड पोलीस स्टेशनला पदोन्नतीचा आदेश देण्यात आला. यावेळी विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते. एकाच वेळी तेऊरवाडी -कमलवडी च्या दोनांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थ आनंदीत झाले.

No comments:

Post a Comment