बुधवारी होणाऱ्या 'सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास' आर्मीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2024

बुधवारी होणाऱ्या 'सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास' आर्मीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार


निपाणी : सी एल वृत्तसेवा
   गणगला (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) गावचे सुपुत्र व सध्या निपाणी येथील रहिवासी 'सुभेदार मेजर गजानन गोविंदराव चव्हाण' ७ मराठा लाईट इन्फंट्री मधून ३४ वर्षांच्या प्रदीर्घ आर्मी सेवेतून मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा निपाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. 
  मराठा लाईट इन्फंट्री चे माजी कमांडंट मेजर जनरल ए बी सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल शिवाजी बाबर, कर्नल विलास सुळकुडे आदी अधिकारी उपस्थित राहणार असून यावेळी 'राष्ट्राच्या जडणघडणीत तरुणांचे योगदान' या विषयावर मधुकर मुकुंदराव पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. सूत्रसंचालक म्हणून पंडित कंदले कोल्हापूर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव कॅम्प येथून दि १ रोजी सकाळी आल्यानंतर निपाणी येथे सकाळी १० वाजता बेळगाव नाका येथून कार्यक्रम स्थळापर्यंत मिरवणूक होणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत सत्कार सोहळा मनोगते व त्यानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन गौरव समिती व मित्रपरिवार निपाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment