रस्त्यावर आलेली झुडपे दुर करताना श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय बुझवडेचे विद्यार्थी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
अडकूर गवसे मार्गावर बुझवडे (ता. चंदगड) गाडी ओहळवर असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडा झुडपांची येथील शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी
बुझवडेच्या विद्यार्थ्यांनी साफसफाई करून रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत केला .
येथील कुरणी- बुझवडे क्रॉस नजिक वळणावर रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली होती . पावसामुळे ही झुडपे पूर्णत: रस्त्यावर आलेली होती . एकदम वळणावर आलेल्या या झुडपांचा अंदाज नसल्याने अनेक वाहनधारक सरळ या झुडपामध्ये जाऊन अडकत होते. मोठ्या चारचाकी गाडयांना या झुडपांच्या फांद्या घासत असल्याने वाहनांचेही मोठे नुकसान होत होते. तर या झुडपांमुळे समोरून एखादे वाहन आले तर खूप मोठी अडचण निर्माण होत होती. पण याकडे संबधीत विभागाने पूर्णतः कानाडोळा केला होता. वाहनधारक व वाहन चालकांची होणारी गैरसोय पाहून शररचंद्रजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस के हरेर व अध्यापक एस के पाटील यांनी तात्काळ विद्यार्थ्यांचे श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले. या रस्त्यावर ५०० मिटर अंतरात वाकलेली सर्व झुडपे तोडून रस्ता वाहतुकीसाठी खूला करून दिला. यासाठी इयत्ता नववीच्या वर्गातील प्रथमेश गावडे, सुजल गावडे, अरूण गावडे, सार्थक कुंभार, प्रेम गावडे, कृष्णा बांदेकर व रवि गिलबिले यानी सहभाग घेतला. विद्यार्थ्यानी सामाजिक बांधीलकी जोपासत केलेल्या या कामाचे सर्व वाहन धारकाकडून कौतूक होत आहे.
No comments:
Post a Comment