राजगोळी खुर्द जवळ गवीरेड्याचे पिल्लू जखमी, भटक्या कुत्र्यांनी पाडला दोन्ही कानांचा फडशा - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2024

राजगोळी खुर्द जवळ गवीरेड्याचे पिल्लू जखमी, भटक्या कुत्र्यांनी पाडला दोन्ही कानांचा फडशा

राजगोळी खुर्द : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले गवी रेड्याचे पिल्लू.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

 राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील बसवेश्वर मंदिराजवळ  गवी रेड्याचे पिल्लू आढळले.  सदर पील्लावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सदर गवीरेड्याच्या पिल्लाच्या दोन्ही बाजूच्या कानाचा फडशा पडला आहे.

या ठिकाणाहून मंगळवारी दिनांक  10 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कागणी येथील वाहनचालक अमित आपटेकर हे जात असताना त्यांना सदर पील्लाजवळ भटकी कुत्री भुंकत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर  पिल्लाचे त्यांनी छायाचित्र काढले.

याबाबत वनपाल जॉन्सन डिसोजा, वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, वनरक्षक डी. एस. रावळेवाड हे त्याच्या मागावर असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर पिल्लू पुन्हा निदर्शनास  आल्यास उपचार करण्याची तयारी वन खात्याने दर्शवलेली आहे. 

जॉन्सन डिसोजा म्हणाले, सदर पिल्लू हे नवजात असून या ठिकाणी मादी असण्याची चिन्हे आहेत. तरी शेतकऱ्यांनी जवळ न जाता सावधानता बाळगावी. अशावेळी मादी हल्ला करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment