माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली, 'एक सच्छील आदर्श' - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2024

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली, 'एक सच्छील आदर्श'



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
        आपल्या देशाचे माजी पंतप्रधान व जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे दि २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. या निमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी त्यांचे रांगोळीतून भावचित्र रेखाटून श्रद्धांजली अर्पण केली.
     वडगाव- बेळगाव येथील रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी  "एक सत्यशील आदर्श" या शीर्षकाखाली रांगोळी काढून श्रद्धांजली वाहिली. दीड फूट बाय २ फूट आकाराची ब्लॅक ॲन्ड व्हाईट कलर मधील  ही कलाकृती ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, माधवपूर, वडगाव- बेळगाव येथे  ४ दिवस पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
    औरवाडकर यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, राजर्षी शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न लता मंगेशकर, भीमसेन जोशी, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सनई वादक बिस्मिल्ला खान, सिंधुताई सपकाळ, सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, बिपिन रावत, श्री राम व अयोध्या मंदिर अशा शेकडो रांगोळ्या टाकून रांगोळी प्रेमींची वाहवा मिळवली आहे.

No comments:

Post a Comment