पाटणे येथील एकाचा विष प्राशन केल्याने मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2024

पाटणे येथील एकाचा विष प्राशन केल्याने मृत्यू



चंदगड : सी एल वृत्तसेवा
     पाटणे (ता. चंदगड) येथील प्रकाश गंगाधर वैजनाथमठ स्वामी (वय ४२) याने विषारी औषध प्राशन केल्याने सिविल हॉस्पिटल बेळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची वर्दी वैद्यकीय अधिकारी सिविल हॉस्पिटल बेळगाव यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे आकस्मिक मयत म्हणून घटनेची नोंद झाली आहे. 
   याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश याने 25 डिसेंबर रोजी सकाळी विष प्राशन केले होते. सिविल हॉस्पिटल बेळगाव येथे त्याच्यावर उपचार सुरू होते तथापि उपचारांचा काही उपयोग न झाल्यामुळे त्याचे दिनांक 29 डिसेंबर रोजी रुग्णालयात निधन झाले. पाटणे व परिसरात ते स्वामी म्हणून व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. विष प्राशन करण्याचे कारण समजू शकले नाही.

No comments:

Post a Comment