सुभाष देसाई यांना यावर्षीचा "धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार" कोल्हापूर येथे प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2025

सुभाष देसाई यांना यावर्षीचा "धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार" कोल्हापूर येथे प्रदान

यावेळी पुरस्कार स्वीकारताना सुभाष देसाई, पत्नी सौ. सुवर्णा देसाई, मुलगा सर्वेश देसाई, मुलगी उलगुलान देसाई व प्रा. दीपक कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    कोण म्हणतंय इंडिया महासत्ता होणार? या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक      ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांना त्यांच्या सामाजिक राजकीय व साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन 'धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर' यांच्या वतीने २०२५ चा "धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार" नुकताच प्रदान करण्यात आला. रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी ट्रस्टच्या वतीने शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन भरविण्यात आले होते.

     यावेळी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक व्यंकाप्पा भोसले, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही शाहीर संभाजी भगत, दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, ट्रस्टच्या अध्यक्षा ड. करुणा विमल, निवड समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमर कांबळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

No comments:

Post a Comment