कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2025

कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुका 'शेकाप'चे आमदार, शाहू -फुले -आंबेडकरांचे कृतिशील अनुयायी, सच्चे सत्यशोधक, बहुजनांची मानसिक व भौतिक गुलामगिरीतून तसेच शोषणातून मुक्त करणारा समाजसेवक, प्रगतिशील शेतकरी, शिक्षण प्रेमी, स्वच्छ चारित्र्याचा राजकारणी, गरिबांचा कैवारी, बहुजन समाजाचा द्रष्ठा सेवक स्व. न. भु. पाटील यांच्या ३४व्या स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

     या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, कार्यक्रमाचे अध्यक्ष न. भु. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराम पाटील तर स्वागत अध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. बांदिवडेकर हे होते. 

      प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी स्व. न. भु. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. आधुनिक पिढीला यांच्या संस्कारांचा वसा आणि वारसा जोपासणे का आणि किती गरजेचे आहे, त्याचे महत्त्व पटवून दिले. गरिबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणारा त्यांना न्याय मिळवून देणारा नेता आजच्या समाजाला हवा असे आवाहन कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी केले.

      या कार्यक्रमांमध्ये डॉ. एस. डी. गोरल व डॉ. व्यंकु कोलकार यांची उपस्थिती असून विक्रम पाटील, स्वप्निल पाटील, संदेश पाटील, पराग येरोळकर, स्नेहल पाटील, प्रतीक्षा कदम, सोनाली नुलकर, छाया बंबर्गेकर, प्रियंका पाटील, विकास निचम, निलेश पाटील, वल्लभ पाटील, प्राची पाटील, जानवी मोहनगेकर, तुकाराम कोळापटे, वेदांत शिंदे, ऋतुजा शिंदे, नम्रता ओउळकर, तनुजा जाधव या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातील दिवंगत झालेल्या व्यक्तींचा शोक प्रस्ताव र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. एस. पी. बांदिवडेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रतिष्ठान सदस्य नितीन पाटील यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

        या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य नागरिक, संस्था शाखांमधील शाळेत कार्यरत असणारे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. मासाळ व श्री. माने यांनी केले. आभार श्री. ताम्रपर्णी विद्यालयाचे ज्येष्ठ डी. जे. पाटील यांनी मानले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 'वंदे मातरम' म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment