चंदगड आगारात सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघटनेच्या फलकाचे अनावरण - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2025

चंदगड आगारात सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघटनेच्या फलकाचे अनावरण



चंदगड आगारात सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाचे फलकाचे अनावरण फीत कापून करताना माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, शेजारी भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, सुरेश सातवणेकर व संघटनेचे पदाधिकारी.

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड आगारात सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या फलकाचे अनावरण माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, उद्योजक लक्ष्मण गावडे, सुरेश सातवणेकर प्रमुख उपस्थित होते. 

माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील म्हणाले, ``एस. टी. ही सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याची आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांनी प्रवाशी केंद्रस्थानी मानून सेवा द्यावी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित आवाज द्या. संघटनेचे अनेक फायदे आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. चंदगड मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार व भाजप सरकार कोठेही कमी पडणार नाही. याची ग्वाही दिली.``

फलक अनावरण प्रसंगी उपस्थित माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व संघटनेचे पदाधिकारी.

माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी एस. टी. ही सर्वसामान्य माणसांची सेवा करणारी आहे. प्रवाशांच्यासोबत कर्मचाऱ्यांचेही प्रश्न महत्वाचे असून ते भाजपच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, सुरेश सातवणेकर, पत्रकार संपत पाटील यांची भाषणे झाली. 

कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर.

    सेवा शक्ती संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष राम मुंडे यांनी प्रवाशी जनतेची सेवा करण्यासाठी संघटीत शक्ती लावून आपल्या हक्कासाठी संघर्षातून यश मिळविण्याचा उद्देश आहे. त्यामुळे संघटनेचे नाव सेवा शक्ती व संघर्ष एस. टी. संघटना असे ठेवले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पाटील यांनीही संघटनेच्या ध्येय व धोरणाविषयी माहिती देवून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अडी अडचणी मध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहणे व कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील सौदार्य पूर्वक वातावरण निर्माण प्रश्न सोडविण्यासाठी संघटना स्थापन केली आहे. अशोक नागरगोजे, आप्पा मोराळे, निरंजन साळुंखे, श्रीरंग नागरगोजे, नितीन आडबे, रामचंद्र सुभेदार, जयसिंग पालकर व नंदू चौगुले यांच्यासह सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवशक्ती संघर्षचे आगार सचिव दिपक कराड यांनी केले. संघटनेचे नेते बाळासाहेब चौकुळकर यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment