संतोष सावंत-भोसले एकनाथ म्हाडगुत |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार' साठी चंदगड टाईम्स चे संपादक पत्रकार संतोष सावंत -भोसले यांची तर उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार साठी चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ म्हाडगुत यांची निवड करण्यात आली आहे. दाटे (ता चंदगड) येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी ही निवड घोषित करण्यात आली.
पत्रकार संघाचे संस्थापक व मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी या नावांची घोषणा केली. हे पुरस्कार धुपदाळे कुटुंबीयांच्या वतीने दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिले जातात. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांच्या 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग' तथा पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी वरील दोन्ही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment