हलकर्णी महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2025

हलकर्णी महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न

 


चंदगड / प्रतिनिधी

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त मराठी विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मराठी अभिजात भाषा विशेषांकाचे भित्तीपत्रक व ग्रंथ पूजन करून या पंधरवडा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले.दौलत भितीपत्रकाचा अभिजात भाषा विशेषांक उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी कु. नम्रता साबळे, कु. दीक्षा पाटील, कु. वैष्णवी शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. अभिजात भाषा आणि मराठी याविषयीचे विवेचन डॉ. सरिता मोटराचे गुरव यांनी केले. प्राचार्य डॉ. बी.डी. अजळकर व उपाध्यक्ष संजय पाटील यांनी भितीपत्रक अंकांचे अनावरण केले. याप्रसंगी उपप्राचार्य आर.बी. गावडे, न्यक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे,, जेष्ठ प्राध्यापक पी. ए. पाटील, डॉ. आय. आर. जरळी ,डॉ. जे. जे .हटकर, प्रा. एन. के. जाविर, प्रा. जी. जे. गावडे, प्रा .जी. पी .कांबळे, प्रशांत शेंडे, गोविंद नाईक, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment