शिनोळी जवळ वेंगुर्ले रोड नजीक झोपडीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2025

शिनोळी जवळ वेंगुर्ले रोड नजीक झोपडीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह



चंदगड : सी एल वृत्तसेवा
   बेळगाव - वेंगुर्ले रस्त्यालगत शिनोळी गावच्या हद्दीत चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ इमारतीच्या शेजारी लोहार काम करणाऱ्या काही लोकांच्या झोपड्या आहेत. येथील एका झोपडीत बेवारस पुरुष जातीचे प्रेत (वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे) कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना शनिवारी दि २५/०१/२०२५ रोजी दुपारी साडेअकरा वाजता उघडकीस आली. याबाबतची वर्दी सुधा यल्लाप्पा जत्ती, पोलीस पाटील शिनोळी बुद्रुक यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
       पोलीस पाटील यांच्या वर्दीवरून चंदगड पोलिसात याबाबत सायंकाळी नोंद करण्यात आली. बेळगाव ते वेंगुर्ला रस्त्यावर घिसाडी, लोहार काम करणाऱ्या कुटुंबाच्या एका झोपडीत वरील पुरुष बेवारस पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. आहे. घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर डोंबे हे अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment