![]() |
कु. अंजली विष्णू गावडे |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा माडखोलकर महाविद्यालयातील कु. अंजली विष्णू गावडे (बीएससी तीन) हिची सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. डी गोरल यांनी विशेष अभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनी तिचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले आहे. कोनेवाडी ता. चंदगड येथील सामान्य गरीब कुटुंबातील विष्णू पांडुरंग गावडे यांची ही कन्या आहे. चंदगड भागातून ही परीक्षा पास होणारी ही एकमेव विद्यार्थिनी असल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment