चंदगड : सी एल वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) गावचे सुपुत्र ॲड. संतोष मळवीकर लिखित त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित या आत्मचरित्रपर ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
भावेश्वरी विद्यालय नांदवडे येथे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमास माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, मनोविकास प्रकाशनचे संचालक आशिष पाटकर यांच्यासह डॉ नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून दौलत अथर्व इंटरट्रेडचे चेअरमन मानसिंगराव खराटे आहेत. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समिती तसेच भावेश्वरी विद्यालय, ग्रामपंचायत, ॲड. संतोष मळवीकर फाउंडेशन व ग्रामस्थ नांदवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment