संजय पाटील यांना 'लक्षवेध कलाकर्तृत्व पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2025

संजय पाटील यांना 'लक्षवेध कलाकर्तृत्व पुरस्कार

संजय मष्णू पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
    चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य  संजय मष्णू पाटील (रा. कोवाड, ता. चंदगड) यांना एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशनच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'लक्षवेध कला कर्तृत्व पुरस्कार' नुकताच जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण 'राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन बेळगाव २०२५' अंतर्गत लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) बेळगाव येथे उद्या २५ जानेवारी २०२५ रोजी ११ वाजता माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप (गोवा), सैन्य दलातील निवृत्त अधिकारी गजानन चव्हाण (निपाणी), बेळगावचे माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, चित्रपट अभिनेते चंद्रकांत लोंढेआदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
  चंदगड  तालुक्यातील कोवाड येथे एक विशेषज्ञ फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर म्हणून संजय पाटील परिचित आहेत. यांनी गेली पाच ते सहा वर्षे चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेल साठी उत्कृष्ट कार्य केले आहे. सन २०१९ मध्ये ताम्रपर्णी नदीला आलेल्या प्रलयंकारी महापुराचे फोटो व व्हिडिओ संकलन असो की कोरोना महामारी काळात हडलगे तेऊरवाडी च्या डोंगरात अडकलेल्या मध्य प्रदेशातील शंभर आदिवासींची अन्नपाण्यावाचून उपासमार सुरू होती. याबाबतचे व्हिडिओ असोत ते  सी एल न्यूज च्या माध्यमातून प्रसारित केल्यामुळे नौदल व शासकीय, प्रशासकीय विभागांची बचाव यंत्रणा पुरात व कोरोना संकटात अडकलेल्या लोकांपर्यंत वेळेत पोहोचू शकली व त्यांचे प्राण वाचले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघासाठी त्यांचे योगदान मोठे आहे ते कोवाड येथील कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून माजी विद्यार्थी संघटनेचे सक्रिय उपाध्यक्ष आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment