चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील दुंडगे येथे भाऊबंदकीवादातून घरात घुसून मारहाण केल्याची घटना दिनांक २३/०१/३०२५ रोजी रात्री ९.०० वाजता घडली. याबाबत पुंडलिक परसू सनदी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुरेश अप्पाजी सनदी, विजय चंद्रकांत सनदी, चंद्रकांत आप्पाजी सनदी सर्व राहणार दुंडगे (ता. चंदगड) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1), 333, 324 (4), 351 (2), 352 (3), (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी. यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे भाऊबंद असून एकाच गावात राहतात. दिनांक २३ रोजी रात्री ९ वाजता पुंडलिक सनदी जेवत असताना अचानक सुरेश अप्पाजी सनदी, विजय चंद्रकांत सनदी चंद्रकांत आप्पाजी सनदी यांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरू केली. तर विजय याने पुंडलिक व त्यांचे वडील वडील परसू शिवाप्पा सनदी यांना दगडाने मारहाण करून धमकी दिली. तसेच पुंडलिक यांचे दरात लावलेल्या स्प्लेंडर दुचाकी चे नुकसान केले आहे. घटनेबाबत स्वतः पुंडलिक यांनी चंदगड पोलीस ठाणे येथे हजर होऊन दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जमील मकानदार करत आहेत.
No comments:
Post a Comment