कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी, कल्याणपूर, हुंदळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण ग्रामपंचायत कागणी येथे संपन्न झाले. ग्रामपंचायत सदस्या मंगल कृष्णा सुळेभावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत ग्रामसेवक बाळू खवरे यांनी केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मराठी विद्या मंदीर व व्ही के चव्हाण- पाटील हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी सैनिक संघटना, शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाळकृष्ण बाबू शहापूरकर यांनी गावातील अंगणवाडी व इयत्ता पहीली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना दहा हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तूंचे वाटप केले. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत नव्याने उभारणी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला गावातील युवकांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद मुरकुटे, पुरूषोत्तम सुळेभावकर, विवेक आपटेकर, विनायक जांभळे, हर्षवर्धन देसाई, पुंडलिक मुरूकुटे, शिवाजी शहापूरकर, जगदीश हगीदळे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment