दत्तू सोनाप्पा कोकितकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील हभप. दत्तू सोनाप्पा कोकितकर (वय ८०) यांचे शनिवार दि.४/१/२०२५ रोजी निधन झाले. गावातील पहिले वारकरी, प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित होते. येथील ग्रामपंचायतचे काही काळ सदस्य व गाव पंच म्हणून कार्य केलेल्या दत्तू कोकितकर यांनी गावातील दूध संस्था उभारणीत व ती सभासदाभिमुख चालवण्यात मोठे योगदान दिले होते. त्यांना भजन कीर्तनाची आवड होती. मृत्यू समयी सुद्धा त्यांनी टेप रेकॉर्डरवरील कीर्तन ऐकतच आपला प्राण सोडला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. करेकुंडी शाळेतील शिक्षक सोनाप्पा कोकितकर यांचे ते वडील तर बेळगाव येथील केएलइ हॉस्पिटलचे डॉ. विनोद कोकितकर यांचे ते आजोबा होते. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ६ रोजी आहे.
No comments:
Post a Comment