कागणी हायस्कूलच्या हॉलमध्ये चक्क ५ पाच फूट लांबीचा नाग ! नैसर्गिक अधिवासात सोडून त्या सापाला जीवदान - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2025

कागणी हायस्कूलच्या हॉलमध्ये चक्क ५ पाच फूट लांबीचा नाग ! नैसर्गिक अधिवासात सोडून त्या सापाला जीवदान

कागणी :  येथील श्री. व्ही के  चव्हाण पाटील हायस्कूलच्या हॉलमध्ये नाग सापाला पकडताना सर्पमित्र विनोद कांबळे. 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    कागणी (ता. चंदगड) येथील हायस्कूल येथील व्ही. के. चव्हाण पाटील हायस्कूलच्या हॉलमध्ये गुरुवारी (दि. 23 जानेवारी) दुपारी २ च्या सुमारास हॉलमध्ये अचानक नाग साप आला. साप आल्याने काहींच्या निदर्शनास आला. 

  साप हॉलमध्ये आल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. कोणीतरी कागणी येथीलच सर्पमित्र विनोद कांबळे यांना याची माहिती  दिली. विनोदने तातडीने शाळेत येवून प्रयत्नपुर्वक नागसापाला पकडले. विनोदने सदर नाग सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. विनोद कांबळे यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आतापर्यंत त्यांनी 2025 या वर्षांमध्ये नऊ विषारी साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. 

No comments:

Post a Comment