चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध असून या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन बजाज फिन्सरचे लीड ट्रेनर सचिन नाडगौडा यांनी केले. ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात करियर गायडन्स सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
सचिन नाडगौडा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम आपले ध्येय निश्चित करायला हवे. त्या ध्येयपूर्तीसाठी व जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वप्ने उराशी बाळगून कार्यरत राहणे गरजेचे आहे. मनाचा दुबळेपणा काढून जिद्दीने जीवनात वाटचाल केल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रास्ताविक प्लेसमेंट सेल व करिअर गायडन्सचे प्रमुख डॉ. आर. एन. साळुंके यांनी करून प्लेसमेंट सेलच्या उपक्रमांची माहिती दिली.
अध्यक्ष भाषणात प्र.प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी बजाज रेसर च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कोर्समध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रा. एल. एन. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. टी. ए. कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रा. बी एम. पाटील, प्रा आर. एस. पाटील. डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. ए. डी. कांबळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते
No comments:
Post a Comment