कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी, म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण शिबिर होत आहे. हे शिबिर २० जानेवारीपासून सुरू झाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी या प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. याप्रसंगी सहसंचालक अनुराधा ओक, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, अशोक पानसरे आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० दिले जात असून, त्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी प्राथमिक (इयत्ता १ ते ५) गटातील २४७ व माध्यमिक्क (इयत्ता ६ ते १२) गटातील २६१ प्रशिक्षणार्थीना देण्यात येत आहे. ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर १० फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण होईल. यात जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्हास्तरावर आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना शिक्षक सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य अभ्यासक्रम आराखडा, शालेय शिक्षण, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमताधारित मूल्यांकन, क्षमता आधारित प्रश्न प्रकार, प्रश्न निर्मिती कौशल्य आदी विषयांचा समावेश आहे. का कोल्हापूर डायटचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई यांच्या मार्ग दर्शना खाली या प्रशिक्षण शिबिरासाठी कोल्हापूर येथून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रमेश कोरे, दत्तात्रय पाटील, संजय साबळे, संजय मगदुम, युवराज पाटील, गिरीश प्रभू, सुहास पाटील, राजेंद्र सुतार, रावसाहेब पानारी, सतिश रणरिंगे, सचिन माने, सारिका माळी, उर्मिला तेली, हेमलता नेथेपाटील, रीटा रॉड्रीग्युस, प्राजक्ता कुलकर्णी हे तज्ञ सुलभक सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment