भारतीय स्वातंत्र लढण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य उल्लेखनीय - प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2025

भारतीय स्वातंत्र लढण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य उल्लेखनीय - प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल

नीुि्े महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल मार्गदर्शन करताना सोबत डॉ. एन. के. पाटील प्रा. ए. डी. कांबळे, डॉ एस. एन. पाटील, डॉ. एस. एस. सावंत
 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     भारतीय स्वातंत्र लढण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी केलेले कार्य अजरामर असून विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्रबोस यांच्या कार्याचा अभ्यास करून आदर्श घ्यावा असे आवाहन  महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभाष चंद्र बोस जयंतीच्या निमित्ताने अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

     प्रारंभी प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी करून इतिहास विभागामार्फत झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन  सुभाष चंद्रबोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून  तरुणांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याबद्दलची स्फूर्ती दिली  असे सांगून त्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या  विविध अंगी कार्याबद्दल मार्गदर्शन केले.

     यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा.एस. व्ही. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. तर डॉ. बी. जीं गावडे यांनी आभार मानले.  या कार्यक्रमाला  हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. जी. वाय कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. आर. के. कमलाकर, डॉ. ए. वाय. जाधव यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment