आमदार शिवाजीराव पाटील यांचा तुडये येथे शनिवारी भव्य नागरी सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2025

आमदार शिवाजीराव पाटील यांचा तुडये येथे शनिवारी भव्य नागरी सत्कार

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   तुडये (ता. चंदगड) येथे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तुडये, सरोळी, ढेकोळी खुर्द व बुद्रुक, सुरूते, कोलिक, म्हाळुंगे, मळवी, हाजगोळी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मी मंदिर तुडये येथे शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अशोक विठ्ठल पाटील हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील , पंस माजी सभापती व भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम पाटील यांच्यासह सचिन बल्लाळ, सुनील काणेकर, दीपक पाटील, ज्योती पाटील, शांताराम बेनके, तुकाराम बेनके, यशवंत सोनार, पत्रकार चेतन शेरेगार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment