मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते पत्रकार अर्जून जाधव यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
निर्भिड व परखडपणे लिहिणारे उदयोन्मुख लेखक, कवी आणि पत्रकार अर्जुन विष्णू जाधव केंचेवाडी (ता चंदगड) यांना मराठी पत्रकार दिनानिमित्त सा. ठाणे नवादूत याच्या वतीने 'साहित्य रत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अर्जुन जाधव हे मुंबई ठाणे येथील वृत्तपत्रांतून वीस-पंचवीस वर्षे आपल्या निर्भिड व परखड लेखणीतून रोखठोकपणे सामाजिक जनजागृती व जन प्रबोधन करणारे लेखन करत आहेत. त्यांनी पत्रकारितेसोबतच विविध विषयांवर लिहिलेली 'जागर, बेळगाव कुणाच्या बापाचं, बागलकोटची सुगंधा, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, लेक जगवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती, प्रेयसी एक आठवण' आदी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, मंडळ, संघटना कडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
No comments:
Post a Comment