ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे कागणी येथे गायरान क्षेत्रात भडकलेला वनवा विझवण्यात यश - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2025

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे कागणी येथे गायरान क्षेत्रात भडकलेला वनवा विझवण्यात यश

कागणी येथे खाजगी गायरान क्षेत्रात भडकलेला वनवा

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे जनावरांच्या चाऱ्याला आणि खाजगी मालकीच्या गायरान क्षेत्राला लागलेली आग विझवण्यात कागणी ग्रामस्थांना यश आले.  आग लागलीच विझवल्यामुळे अनेक गवत गंजी भस्मसात होण्यापासून वाचल्या व मोठा अनर्थ टळला. 
 जाहिरात

   शुक्रवार दि. १० रोजी  कागणी (ता. चंदगड) येथील शेतकरी नरसिंग बाचुळकर, शशिकांत बाचुळकर, प्रथमेश देसाई  यांचे कुरण व खाजगी गायरान क्षेत्राला अचानक दुपारी अडीच वाजता आग लागली. या घटनेमध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेजारी अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी साठवलेल्या गवत गंजी, काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्व आगीच्या भक्षस्थानी पडणार हे लक्षात येताच घटनेचे गांभीर्य ओळखून  ग्रामपंचायत सदस्य जनार्दन देसाई यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवर तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी आग विझवण्यात यश मिळवले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

No comments:

Post a Comment