चंदगड : सी एल वृत्तसेवा
कलिवडे- धनगरवाडा (ता. चंदगड) येथे दारात काढलेला संडासचा खड्डा मुजवल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 8 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता घडली. याबाबतची फिर्याद जखमी बमाबाई सखाराम लांबोर यांनी चंदगड पोलिसात दिल्यावरुन आरोपी तानाजी विठ्ठल बाजारी व सौ कविता तानाजी बाजारी दोघेही राहणार कलिवडे धनगरवाडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, यातील आरोपी तानाजी यांनी फिर्यादी बमाबाई यांच्या घरासमोरच संडास बांधण्यासाठी खड्डा काढला होता. तो रमाबाई यांचे पती यांनी मुजवल्याच्या कारणावरून दोन्ही आरोपींनी बमाबाई यांना शिवीगाळ करून तसेच हात पिरंगळून जखमी केले आहे. बमाबाई यांच्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 117 (2), 115 (2), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस हेडकॉन्स्टेबल आंबुलकर हे अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment