![]() |
कृष्णा विठोबा पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कृष्णा
विठोबा पाटील (वय ७५) यांचे दि. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सात वाजता
अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मानेवर
शस्त्रक्रिया झाली होती. ते विद्यार्थी व शिक्षक प्रिय
धडाडीचे शिक्षक म्हणून परिचित असलेले कृष्णा पाटील हे महाराष्ट्र राज्य
प्राथमिक शिक्षक संघाचे कट्टर समर्थक होते. शिक्षण क्षेत्रात चाललेल्या
लाचारी व लाचखोरी विरोधात सेवेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते
आपल्या बोलण्यातून हल्ला चढवत. आपल्यापैकी स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांनी
अनेक अधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेतला होता. त्यांच्या पश्चात तीन विवाहित
कर्ते चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर नागरदळे येथे
सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment