हळदीकुंकू समारंभात बोलताना शितल पाटी
चंदगड /सी. एल. वृत्तसेवा
प्रत्येक सण साजरा करताना त्याला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टी असते. फार पुरातन काळापासून हळदी कुंकूचे महत्त्व आहे. हा कार्यक्रम म्हणजे महिलांना मिळणारा मान सन्मान आणि हक्काचे व्यासपीठ होय. महिलांनी आपली प्रगती साधावी. अशा कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने संस्कारांची बीजे रुजविली जातात.' असे मत सौ. शितल पाटील यांनी शिवणगे ता. चंदगड येथे आयोजित हळदी कुंकू समारंभात प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले. शिवणगे (ता. चंदगड) येथे दौलत विश्वस्थ संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर निमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सौ. शितल पाटील आणि अलका शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी शिवणगेच्या उपसरपंच सुमन सांबरेकर उपस्थित होत्या.
प्रा. गीतांजली पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी अलका शिंदे यांनी भारतीय प्राचीन संस्कृतीचे अनेक दाखले देत हळदी कुंकूचे महत्व विशद केले. भारतीय संस्कृतीमधील अनेक कर्तबगार स्त्रियांचा इतिहास आपल्या मनोगतातून स्पष्ट केला.
यावेळी व्यासपीठावर सुमन गोपाळराव पाटील, शितल पाटील, अलका शिंदे, रेणुका मुंगारे , श्वेता पाटील, सुषमा पाटील, सुजाता पाटील, प्रियंका शिवणगेकर ,साधना पाटील, आदी मान्यवर उपस्थित होत्या. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी शाहू गावडे, यु एस पाटील, रामसिंग पाडवी व सर्व एनएसएस कमिटीच्या सदस्यांनी केले. यावेळी गावातील महिला वर्ग, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ. ज्योती व्हटकर यांनी केले तर आभार साक्षी पाटील हिने मानले.
No comments:
Post a Comment