चंदगड पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग-२०२५' चा थरार' २ फेब्रुवारी पासून...! २० संघांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2025

चंदगड पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग-२०२५' चा थरार' २ फेब्रुवारी पासून...! २० संघांचा सहभाग

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा

       मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२५' ही स्पर्धा रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ पासून इंडॉल क्रीडांगण (बेळगाव वेंगुर्ला हायवे हिंडगाव फाटा नजीक) येथे सकाळी ११ वाजता  सुरू होणार आहे. 


      दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय निमशासकीय व सहकार क्षेत्रातील दिग्गज संघातील थरारक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यंदाही या स्पर्धेत शासकीय व निमशासकीय २० दिग्गज संघांनी सहभाग नोंदवला आहे.

इंडियन प्रो कबड्डी चे स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई यांना निमंत्रण देताना चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील व पत्रकार संजय पाटील सोबत सिध्दार्थ यांचे बंधू स्टार कब्बडीपटू सुरज देसाई व वडील शिरीष देसाई,

     स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता इंडाल मैदानावर होणार आहे. 

   स्पर्धेचे उद्घाटन चंदगडचे दिवानी व फौजदारी न्यायाधीश माननीय अगरवाल सो यांच्या अध्यक्षतेखाली सहन्यायाधीश वामन जाधव, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, बांधकाम अभियंता इफ्तेकार मुल्ला, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, तालुका आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ, राज्य परिवहन महामंडळ चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील, तालुका कृषी अधिकारी विजय गमदारे, रेंजर नंदकुमार भोसले (चंदगड) व प्रशांत आवळे (पाटणे), ग्रामीण रुग्णालय अधीक्षक कुपेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी वकील बार असोसिएशन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

    स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपटू, प्रो कबड्डीचे स्टार बाहुबली खेळाडू चंदगड तालुक्याचा अभिमान सिद्धार्थ शिरिश देसाई उपस्थित राहणार आहेत. तरी उद्घाटन प्रसंगी सहभागी २० संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पत्रकार, हितचिंतक व प्रेक्षकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार चषक ऑफिसर्स लिग 2025 मधील सहभागी संघ

1.पत्रकार

2.पोलीस 

3.एसटी 

4.कृषी विभाग 

5.महावितरण 

6.वन विभाग 

7.तहसिल कार्यालय

8.आरोग्य विभाग

9.पीडब्ल्यूडी

10.नगरपंचायत

11.एलआयसी 

12.प्राध्यापक वॉरियर्स 

13.माध्यमिक शिक्षक

14.बँक व पतसंस्था

15.कृषी सेवा केंद्र

16.महा ई सेवा

17.न्यायालय

18.पंचायत समिती

19.सेवानिवृत्त शिक्षक

20.एच. डी. एफ. सी. बँक


सलामीचा सामना - पोलीस VS कृषी विभाग

No comments:

Post a Comment