चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने कोल्हापूर पॉवरलिफ्टींग असोसिएशन व व्ही पाॅवर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध वजनी गटामध्ये भगतसिंग अकॅडमीच्या विद्यार्थांनी यश संपादन केले.
43 किलो मध्ये - 1)कु. विद्या बिर्जे गोल्ड मेडल.
47 किलो मध्ये - 1)कु.अश्विनी नाईक सिल्वर मेडल.
52 किलो मध्ये 1) कु. श्रुती प्रधान सिल्वर मेडल.
2) कु. कविता कदम ब्रॉझ मेडल.
57 किलो मध्ये 1) कु. किरण गुरव गोल्ड मेडल.
63 किलो मध्ये 1) कु. अर्पिता वरपे सिल्वर मेडल.
2)कु. कृतिका पाटील ब्रॉझ मेडल.
69 किलो मध्ये 1) कु. दीक्षा कांबळे सिल्वर मेडल.
या सर्वांना अभिजित कांबळे, मधूकर कांबळे, शंकर पाटील, वैजु पाटील, समृद्धी चव्हाण यांचे मागदर्शन लाभले. तसेच रेणुका इन्फ्रास्टक्चरचे मालक परशुराम काकतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यातील चार मुलींची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या सर्व मुली यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे शिक्षण घेत आहेत.
No comments:
Post a Comment