![]() |
कै. टी. के. पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री ग्रामस्थ मंडळ मुंबई चे माजी अध्यक्ष तसेच कालकुंद्री नागरी पतसंस्था मुंबईचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम केदारी पाटील तथा टी. के. पाटील (वय ७४ वर्षे), रा. हुंबरवाडी, ता. चंदगड (मुळगाव - कालकुंद्री, ता. चंदगड) सध्या राहणार कांजुर मार्ग, विक्रोळी मुंबई यांचे मंगळवार दिनांक २८/०१/२०२५ रोजी रात्री निधन झाले. काही दिवसापूर्वी मान दुखी मुळे त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. तर गेल्या आठवड्यात व्यायाम करताना हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सुना नातवंडे असा परिवार आहे. आज दिनांक २९ रोजी सकाळी १० वाजता नाहूर रेल्वे स्टेशन हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंदगड तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांचे ते चुलत काका तर माणगाव ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सदस्य विकास पुंडलिक पाटील (हुंबरवाडी) यांचे ते काका होत.
बायर इंडिया या अमेरिकन कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असायचे. चंदगड तालुक्यातील शेकडो तरुणांना त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे करण्यात मदत तसेच नोकऱ्या लावून त्यांची कुटुंबे उभे करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे चंदगड तालुका वाशियांचा मुंबईतील एक आधारस्तंभ हरपला आहे. चंदगड तालुका पत्रकार संघ, पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्यूज चे वाचक व प्रेक्षक तसेच चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
No comments:
Post a Comment