चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात शुक्रवारी (ता. १७) ला एक दिवशीय व्यापार / व्यवसायाची प्रात्यक्षिक कौशल्य विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी "व्यापार जत्रा आणि फन्नी गेम्स" (Trade Fair/Food Festival and Funny Games) हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी विविध प्रकारचे पारंपारिक आणि आधुनिक खाद्य पदार्थ उदा. भाजी भाकरी (नाचणी, तांदुळ, ज्वारी) शिरा, उपमा, गोबी मचूरियन, वडापाव, भेळपुरी, समोसा आदी दोन डझन स्टॉल उभे करणार असून एक प्रकारचा खाऊ कट्टा तयार होणार आहे. त्याबरोबरच मनोरंजनात्मक खेळाची (Funny Games) म्हणून स॑गित खुर्ची, पाण्याच्या बकेट मधिल ग्लास मध्ये पैसे टाकणे इ. धमाल असणार आहे.
विषेशतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आवडीचा आणि चार भि॑ती बाहेरील ज्ञान प्राप्त करण्याचा "व्यापार जत्रा आणि फन्नी गेम्स" (Trade Fair/Food Festival and Funny Games) हा उपक्रम सर्वाच्या आनंदात भर घालण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे असे प्राचार्य डॉ एस डी गोरल व समन्वय डॉ एन एस मासाळ यांनी सांगितले आहे. सदर उपक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी प्रयत्नशील आहेत.
No comments:
Post a Comment