चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील ऊसतोडणी व वाहतुक कामगारांच्या मुलांसाठी व भटक्या समाजातील मुलांसाठी शालेय अभ्यासिका व प्रौढांसाठी साक्षरता वर्गाचे आयोजन रामपूरचे सुपूत्र व वि.मं.बेरडवाडा-वरगांव शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी दौलत- अथर्व साखर कारखाना परिसर,पाटणे फाटा परिसर,चंदगड-नागनवाडी परिसर,हेमरस शुगर -राजगोळी-कोवाड परिसर व नलवडे शुगर फॅक्टरी परिसर,हेरे परिसरातील भटक्या व ऊसतोडपी मुलांसाठी आयोजित केले आहे.यांसाठी स्वयंसेवक म्हणून शाहू दत्तू पाटील,मिनाक्षी नाईक,निर्झरा नाईक,मयुरी नाईक,कल्लापा पाटील कामकाज करत आहेत.यांसाठी मुले व पालकांच्या सोयीनुसार अभ्यासिका व साक्षरता वर्गाचे आयोजन केले आहे.सदर हंगामासाठी परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी पालकांच्या व मुलांच्या भेटी घेवून वही-पेन,अंकलिपी,पाटी,चटई ,अंक व अक्षर ओळख तक्ता,फलक अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप ५०० पेक्षा अधिक मुलांना करणेत आले.तसेच मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य,कपडे,माता भगिनींना साड्या व स्वेटर व मिठाईचे वाटप करणेत आले.यांवेळी बाबुराव वरपे यांनी पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व विशद करताना ,-शिक्षण ही मोठी ताकद असून आपल्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे.शिक्षणातून आपण एक चांगला नागरिक घडताना आपले ध्येय ही उच्चत्तम ठेवावे व उच्च पदापर्यंत पोहोचणे ची जिद्द ठेवावी असे आवाहन केले.यांवेळी ऊसतोडणी कामगार बंधू-भगिनी,मुले, स्वयंसेवक शाहू पाटील ,मिनाक्षी नाईक,निर्झरा नाईक,मयुरी नाईक व कल्लापा पाटील उपस्थित होते. यावेळी सहकार्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. प्रेरणा आणि मार्गदर्शन चंदगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सुमन सुभेदार, दाटे केंद्रप्रमुख सौ. शोभाताई देसाई, दाटे ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच किरण दादा नाईक,शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक, सौ. शारदा वरपे, साहील वरपे व सायली वरपे यांचे सहकार्य लाभल्याचे श्री. वरपे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment