ॲड. जी. एन. दळवी यांची पब्लिक नोटरी पदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2025

ॲड. जी. एन. दळवी यांची पब्लिक नोटरी पदी निवड

 

ॲड. गोविंद नामदेव दळवी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   चंदगड व गडहिंग्लज न्यायालयात गेली अनेक वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असलेले ॲड. गोविंद नामदेव दळवी, रा. माडवळे (ता. चंदगड) यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या न्याय व विधी विभागाकडून त्यांची नुकतीच पब्लिक नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. चंदगड तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली होती.

No comments:

Post a Comment