प्रजापिता ब्रह्माकुमारीज मार्फत कोवाड येथे १९ रोजी 'यशाची गुरुकिल्ली राजयोग' कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2025

प्रजापिता ब्रह्माकुमारीज मार्फत कोवाड येथे १९ रोजी 'यशाची गुरुकिल्ली राजयोग' कार्यक्रमाचे आयोजन


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोवाड सेंटर यांच्यामार्फत शिव वरदानी भवन ब्रह्माकुमारी कोवाड, (तालुका चंदगड) येथे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत 'यशाची गुरुकिल्ली राजयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
   सद्यःस्थितीत समस्त मानव जाती रोग, शोक, दुःख, अशांती अशा मानसिक व शारीरिक व्याधींनी ग्रस्त झालेली आहे. यातून मुक्त होऊन एक अर्थपूर्ण चारित्र संपन्न जीवन घडवण्यासाठी राजयोग हा एक उत्तम मार्ग आहे. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समुपदेशक, राज्य प्रशिक्षक प्रेरणादायी वक्ता डॉ. सचिन परब (मुंबई) हे उपस्थित राहून राज योगाद्वारे मानसिक संतुलन, मनाची शांती, व्यसनमुक्त व तणाव मुक्त जीवन यांचा कसा लाभ होतो यावर मार्गदर्शन करणार आहेत.  राज योगाच्या आधारे विविध विधींचे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्रह्मकुमारी कोवाड केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment