चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे बागिलगे येथे 5 फेब्रुवारीपासून श्रमसंस्कार शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2025

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे बागिलगे येथे 5 फेब्रुवारीपासून श्रमसंस्कार शिबिर


चंदगड / सी एल वृत्तसेवा

   चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर बुधवार दि. ५ ते मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये शाश्वत विकासासाठी युवक या घोषवाक्य अंतर्गत बागिलगे (ता. चंदगड) येथे होत असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी दिली.

बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता बागिलगेचे सरपंच नरसू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल अध्यक्षस्थानी असतील. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व शिवाजी विद्यापीठाच्या रा स यो चे संचालक डॉ. टी. एम. चौगुले मार्गदर्शन करतील.

गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कायदा आणि व्यवस्था या विषयावर ॲड. विजय कडुकर यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ॲड. आर. पी. बांदिवडेकर असतील.

शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांचे आरोग्य आणि समस्या या विषयावर डॉ. स्नेहल मुसळे व प्रा. वंदना कालकुंद्रीकर मार्गदर्शन करतील.

शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी  २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता शासकीय कृषी योजना व सुधारित शेती तंत्र या विषयावर कृषी पर्यवेक्षक संतोष कुटवड व कृषी सहाय्यक सुधाकर मुळे मार्गदर्शन करतील.

रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पशु चिकित्सा शिबिर व पशुधन काळजी या विषयावर गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन कापरे, डॉ. सचिन पोवार आपले विचार मांडतील.

सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता युवकांसमोरील आव्हाने व व्यसनमुक्ती या विषयावर राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील मार्गदर्शन करतील. रात्री ९ वाजता माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यकमाचे सादरीकरण होईल.

मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता समोरच कार्यक्रम  होईल. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील व  माजी मंत्री भरमू अण्णा पाटील प्रमुख पाहुणे असतील. तहसीलदार राजेश चव्हाण मार्गदर्शन करतील. खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर. पी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी के एस माळवे, पत्रकार संपत पाटील व चेतन शेरेगार प्रमुख  उपस्थित असतील.

शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता, निर्मल ग्राम अभियान, जलसाक्षरता, एड्स जनजागृती, अवयव दान जागृती, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, प्रदूषण मुक्ती, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, आरोग्य शिबिर, डिजिटल इंडिया, आजादी का अमृत महोत्सव, करमणूक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन व आपत्ती व्यवस्थापन हे उपक्रम राबवले जाणार आहेत.

   शिबिराला उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment