![]() |
सोनम दत्तात्रय खाडे |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नरसू रामू चव्हाण यांची तर उपाध्यक्षापदी सोनम दत्तात्रय खाडे यांची निवड झाली.
शाळेच्या सभागृहात नुकताच पालक मेळावा घेण्यात आला. या मध्ये सदर पदाधिकारी निवड करण्यात आली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जयराम कांबळे होते. समितीचे सचिव व शाळेचे मुख्याध्यापक सदानंद मोरे (गडहिंग्लज) यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना, कार्य, जबाबदारी याची माहिती दिली.
यानंतर 2024 ते 2026 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी मेळाव्याला उपस्थित पालकांमधूनच नवीन पदाधिकारी निवड करण्यात आले.
यामध्ये नरसू रामू चव्हाण (अध्यक्ष), सोनम दत्तात्रय खाडे (उपाध्यक्षा), तर सदस्य म्हणून मनीषा प्रल्हाद मुरकुटे, मंगल परशराम बाचूळकर, सदस्य म्हणून संतोष दूंडाप्पा हागीदळे, बाळकृष्ण बाबू शहापूरकर, परशराम मारुती पाटील, आप्पाजी बाळेशी पाटील, (बुक्कीहाळ बुद्रुक), परशराम नारायण कांबळे (कल्याणपूर), शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून शंकर महादेव पुजारी, शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुभाष हवालदार व सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सदानंद भैरू मोरे यांची निवड करण्यात आली. या शाळेचे 2025 ते 2026 शतक महोत्सवी वर्ष असून या वर्षानिमित्त शाळेच्या भौतिक सुधारणा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यात आली. त्याला उपस्थित पालकांचा व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सूत्रसंचालन शिक्षक बाळकृष्ण मुतकेकर यांनी केले. आभार शिक्षक सुभाष हवालदार यांनी मानले.
No comments:
Post a Comment