देवरवाडीतील सेवाभावी संस्थेकडून गुणगौरव सोहळा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2025

देवरवाडीतील सेवाभावी संस्थेकडून गुणगौरव सोहळा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

  देवरवाडी, ता चंदगड येथील प्रज्ञावंत बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. १ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत देवरवाडीच्या पटांगणात पंचक्रोशी व तालुक्यातील गुणवंत व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला व क्रीडा क्षेत्रातील  गुणवंतांचा सत्कार झाला. समाजातील विद्यार्थी पालक वर्ग यांचे मनोबल वाढवणे, समाजातील निष्पक्ष वृत्तीने व मानवतेच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या कार्याला पाठबळ देवून त्यांना गौरवीत करणे हा शुद्ध हेतू यामागे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.

या कार्यक्रमात देवरवाडी गावात प्रदीर्ध काळ विद्यादानाचे कार्य केलेल्या प. रा. पाटील गुरुजी वय वर्ष 95 (ज्येष्ठ शिक्षक), डॉ. मनोज लक्ष्मण तरळे (कोरोना योद्धा, डॉक्टर), बसवराज रायाप्पा पुजारी,

सामाजिक कार्यात पुढे असणारे नारायण वाईगडे - शे.का.प (बांधकाम कामगार पक्ष आंदोलक), गुणवंत शिक्षक विजय विठ्ठल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते व शासनाचे  कायम निमंत्रित सदस्य (अनुसूचित जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक समिती अधिनियम 1989.निवड झालेले) संघर्ष मष्णू प्रज्ञावंत, वंचित, पीडित यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे सर्जनशील व्यक्तिमत्व प्रा. डॉ. नागेंद्र कृष्णा जाधव (प्रदेशाध्यक्ष, न्यायनिवाडा  लोकनेता फाउंडेशन महाराष्ट्र व कार्याध्यक्ष जन ग्रामीण पत्रकार संघ, कोल्हापूर), मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्या समर्थनात साखळी उपोषण केलेले शिवश्री संदिप अर्जुन भोगण (मराठा समन्वयक), कार्यतत्पर प्राथमिक शिक्षक विनायक बाबू प्रधान, कॅप्टन तुकाराम यल्लाप्पा कांबळे ( सुंडी), 

शुभांगी महेश गावडे (आरोग्य सेविका देवरवाडी), देवरवाडीचे सुपुत्र संदिप कृष्णा जाधव (पोलीस उपनिरीक्षक दादर मुंबई), डॉ. निवृत्ती एम. गुरव  (शिनोळी) चंदगड पोलीस ठाण्याचे कार्यक्षम पोलीस अधिकारी विश्वास पाटील, डॉल्फिन अँड डॉल्फिन कंपनीचे मालक आर. के बाला या सर्व मान्यवर गुणवंतांना शाल, श्रीफळ, चषक, मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव शिक्षक वैजनाथ कांबळे यांनी सूत्रसंचालन, प्रा. प्रकाश नाग यांनी प्रास्ताविक केले. रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे सूत्रसंचालन जोतिबा गुरव यांनी केले.

या कार्यक्रमात लहान गुणवंत विद्यार्थ उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी, कला गुणांना वाव देवून येणारी पिढी कार्यक्षम बनणार असल्याचे मत अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी गावातील नागरिक, महिलांवर्ग, विद्यार्थिवर्ग, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध पदावर कार्यरत असलेले देवरवाडीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे खजिनदार देवेंद्र कांबळे यांनी मानले. एकनाथ कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment