भाविक, दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांच्या अमृतमय सहकार्यातून चंदगड शहरात साकारलेल्या स्वंयभू श्री चंद्रसेन मंदिराची वास्तुशांती, जिर्णोध्दार व कलशारोहण सोहळा शुक्रवार ७ ते सोमवार १० फेब्रुवारी पर्यंत आयोजित केला आहे.
मंदिराचा वास्तुशांती, जिर्णोध्दार व कलशारोहण सोहळा पुरोहित वेदमूर्ती सुनील सोमन व सहकाऱ्यांच्या वेदमंत्र घोषामध्ये होणार आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मुहूर्तमेढ, ग्राम देवदेवतांना आवाहन, प्रायश्चित विधी, शनिवार दि ८ सकाळी ९ पासून कलश मिरवणूक, पुण्याहवाचन, शांती होम, जलाधिवास, पिठदेवता स्थापन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंकाळी ७ वाजता सोंगी भजन, रविवारी सकाळी ९ पासून प्राकार वास्तू शुध्दी, यज्ञहोम विधी, संप्रोक्षण, सायंकाळी ७ वाजता मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम, सोमवारी दि १० सकाळी ९ पासून प्रकाश शुध्दी, महाअभिषेक, उर्वरित यज्ञ, कलशारोहण, बलिदान, पुर्णाहुती, आरती, गाऱ्हाणे, सकाळी १० वाजता मठाधिपती श्री. ब. ब्र. श्री. गुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्री सुरगीश्वर संस्थान मठ क.नूल यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. दुपारी १२ पासून महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता भजन होणार आहे.
या सोहळ्याचा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रसेन गणेशोत्सव मंडळामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment