चंदगड : सी एल वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर बुधवार दिनांक 5 ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बागिलगे. ता. चंदगड येथे होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस डी गोरल व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.एस. एन. पाटील यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत र. भा.माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे राष्ट्रीय योजनेचे 'शाश्वत विकासासाठी युवक' हे घोषवाक्य साध्य करण्यासाठी होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन बागिलगेचे सरपंच श्री नरसु पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी गोरल हे आहेत, यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, रा. से. यो. चे संचालक टी एम चौगुले, एम्.एम. तुपारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दि. 6 रोजी 'कायदा व सुव्यवस्था' या विषयावर ॲड विजय कडुकर यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ॲड. आर पी बांदिवडेकर आहेत, शुक्रवार.दि. 7 रोजी 'महिलांच्या आरोग्य व समस्या' या विषयावर डॉ स्नेहल मुसळे पाटील, व प्रा वंदना कालकुंद्रीकर यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ग्रा.प सदस्या संपदा गुरव ह्या आहेत. शनिवार दि. 8 रोजी 'शासकीय कृषी योजना व सुधारित शेती तंत्र' या विषयावर कृषी पर्यवेक्षक संतोष खुटवड व कृषी सहाय्यक सुधाकर मुळे यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एस आर.पाटील हे आहेत. रविवार दि. 9 रोजी 'पशुचिकित्सा शिबिर व पशुधन काळजी' या विषयावर गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डॉ प्रकाश साळुंके व डॉ गजानन कापरे, डॉ सचिन पोवार यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी श्री सदानंद गणू पाटील हे आहेत. सोमवार दिनांक 10 रोजी *'युवकांसमोरील आव्हाने व व्यसनमुक्ती' या विषयावर राज्य करअधिकारी गोपाळ पाटील यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष एस. एस. आवडण हे आहेत. रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. पी आर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवार दि. 11 रोजी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून, आमदार श्री शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री श्री भरमुअण्णा पाटील हे आहेत. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार असून अध्यक्षस्थानी प्रा आर पी पाटील हे आहेत. याचबरोबर या शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ.एस. डी.गोरल, समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment