तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
सध्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढत असणाऱ्या गुलेन बॅरी सिंड्रोम guillain barre syndrome या रोगामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण नागरिकांनी याला घाबरून न जाता पूर्ण घबरदारी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी डी सोमजाळ यानी केले. या संदर्भात डॉ सोमजाळ यांनी पुढील माहीती दिली....
१ ) सध्या पुणे शहरात या आजाराचे जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. हा दुर्मिळ आजार असून एक लाख लोकसंख्येमध्ये एका वर्षाला एक किंवा दोन केसेस आढळतात
2. हा आजार संसर्गजन्य नाही. ह्या आजाराचे ऑटो इम्युनू (auto immune) प्रकारात वर्गीकरण होते. म्हणजेच या आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती आपल्याच पेशींच्या विरुद्ध काम करते.
3. विषाणू (viral) किंवा जिवाणू (bacteria) संसर्गानंतर काही व्यक्तींमध्ये एक ते दोन आठवड्यांनी या आजाराची लक्षणे आढळतात. यामध्ये स्वतःची रोग प्रतिकार शक्ती स्वतःच्या शरीरातील चेतापेशींवर (nerves) हल्ला करतात. परिणामी मेंदू कडून पूर्ण शरीराकडे संदेश वाहन करणाऱ्या चेता यांचे नुकसान होते. किंवा त्या पूर्णपणे नष्ट होतात
आजाराची लक्षणे
प्रथमतः दोन्ही पायांमध्ये कमजोरपणा जाणवणे, उभे राहताना पाय लटपटणे, पायऱ्या व्यवस्थित न चढता येणे, पायांमध्ये चप्पल व्यवस्थितपणे न घालता येणे, थोडे घालूनही पायांमध्ये मुंग्या व बधिरता येते.
गुलेन बॅरी आजार पायांकडून चालू होऊन हळूहळू वाढत दोन्ही हाताकडे जातो. डोळ्यांवरही याचा परिणाम होतो
हा आजार असाच वाढत गेल्यास ज्या स्नायूंद्वारे श्वास घेतो त्या स्नायूंवर परिणाम झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. त्यावेळी कृत्रिम श्वास यंत्रणेची (ventilator) गरज भासते.
कोणती काळजी घ्यावी
1.हा आजार जास्त प्रमाणात दूषित पाण्यामुळे व दूषित अन्नामुळे (camplo bacter jejuni) या जिवाणू मुळे होत असल्याने नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
2. शक्यतो करून रस्त्यावरचे पदार्थ फास्ट फूड व जंक फूड अन्न टाळावे.
3. पालेभाज्या व फळे स्वच्छ धुऊनच वापरावेत.
4. पूर्ण शिजलेले व ताजे अन्न खाण्यास प्राधान्य द्यावे.
5. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी मांस पूर्णपणे शिजवूनच खावे.
6. हातांची नियमित स्वच्छता राखावी- जसे की जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, शौचास जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, स्वयंपाक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे.
7. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
8.एकंदरीत आपली रोग प्रतिकार शक्ती (immunity) सतत चांगली राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी अशी लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी डी सोमजाळ यांनी केले.
तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या चंदगड येथील आरोग्य विषयक आढावा बैठक प्रसंगी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन डॉ. सोमजाळ यांना वरील आजाराविषयी माहिती विचारली. यावेळी सोमजाळ यांनी सविस्तर माहिती दिली. पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आरोग्य विभागाच्या रुग्णाभिमुख कार्याबद्दल कौतुक केले. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी केली. यावेळी शालेय आरोग्य तपासणीच्या अनुषंगाने चर्चा झाली. या तपासणीच्या वेळी आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत गैरहजर राहणार नाही याची शिक्षक व त्यापेक्षा अधिक पालकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागाने केले. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सावंत- भोसले, डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष संपत पाटील, पत्रकार अनिल धुपदाळे, चेतन शेरेगार, राहुल पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment