शिवजयंती, महाशिवरात्री सणांच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलिसांचे पथसंचलन - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2025

शिवजयंती, महाशिवरात्री सणांच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलिसांचे पथसंचलन

चंदगड शहरात पथसंचलन करताना विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार 

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या शिवजयंती उत्सव तसेच महाशिवरात्री व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने चंदगड शहरात पथ संचलन करण्यात आले. आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.  चंदगड  शहरातील पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, छ. संभाजी चौक, जामा मस्जीद, कुंभार गल्ली, कैलास कॉर्नर, रवळनाथ गल्ली अशा मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला. पथ संचलनात विभागातील पोलीस ठाणे चे ११ अधिकारी, ७५ पुरुष अंमलदार व २६  महिला अंमलदारांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment