कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी सेवा समितीची नवीन कार्यकरणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीवर रंगराव शंकर पाटील (एस आर पाटील) यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. आमशी, ता. करवीर गावचे सुपुत्र रंगराव पाटील हे जि प शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून ३८ वर्षे सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. एक जर्नालिस्ट म्हणून ते कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहेत. आपल्या लेखन शैली साठी प्रसिद्ध असलेल्या रंगराव पाटील यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य शब्दगंध साहित्य परिषदेच्या करवीर तालुका प्रमुख पदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदावर ते सन २०२७ अखेर कार्यरत राहणार आहेत.
रंगराव पाटील यांचे जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांमधील योगदान, परोपकारी व अभ्यासू वृत्ती यांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. ही निवड सन २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी राहणार आहे. निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष विनायक घटे, सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, कार्याध्यक्ष सिताराम शिंदे आदींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. रंगराव पाटील यांच्या दोन्ही निवडी बद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment